इंदापूर : प्लास्टिक हे मानवी जीवन व पर्यावरणाला अतिशय घातक आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे मिठी नदीला, मुंबईमध्ये आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा उल्लेख केला. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळला आणि टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर केला तरच टाकाऊ प्लास्टिक कचºयाची समस्या नाहीशी होईल. त्यासाठी जिओ गार्डनसारखे अनेक प्रकल्प उभे राहिले पाहीजेत, असे मत प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या मार्फत उभारलेल्या भूउद्यान आणि लघुवनस्पती प्रकल्पास (जिओ गार्डन) शुुक्रवारी ५०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य चाकणे बोलत होते. या उद्यानात विविध वनस्पती, विविध फुलांच्या प्रजाती, औषधी वनस्पती, काटेरी वनस्पतींचा समावेश असून भूगोल विभागा ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभा करण्यासाठी कष्ट घेतले. भूगोल विभागप्रमुख प्रा.भगवान बारवकर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर, प्रा. गजानन मेश्राम, प्रा. संदीप शिंदे, प्रा.आत्माराम फलफले, डॉ. महंमद मुलाणी, प्रा. रोहित लोंढे, प्रा. राधिका घुगे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक प्रकल्पाचे समन्वयक प्रा. दर्शन दळवी यांनी केले. सूत्रसंचलन तानाजी करचे यांनी केले. आभार प्रा. संदीप शिंदे यांनी मानले. यावळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिओ गार्डन उद्यानामध्ये काय आहे?जिओ उद्यानात फुलांच्या ४६ प्रजाती, औषधी वनस्पती २७, निवडुंगाच्या काटेरी वनस्पती ४२ अशा ११५ प्रकारचे वनस्पती आहेत. याव्यतिरिक्त गारगोटी उद्यानात विविध आकाराच्या रंगाच्या गारगोट्यांते संवर्धन केले आहे. टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून विविध घरसजावटीच्या व उपयोगी अशा ४९ प्रकारच्या वस्तूंची निर्मिती विभागातील प्लास्टिक विरोधी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.