शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

पीएमपी कर्मचाऱ्यांची बढती, पगारवाढ बेकायदा

By admin | Published: July 17, 2015 3:56 AM

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) निर्मिती झाल्यानंतर काही महिन्यांतच १३ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे बढती व वेतनवाढ देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) निर्मिती झाल्यानंतर काही महिन्यांतच १३ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे बढती व वेतनवाढ देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत संंबंधित बढती व सुधारित वेतनश्रेणीस केवळ सहा महिन्यांचीच मान्यता देण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळाच्या मान्यतेशिवायच या अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. त्यावर तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनीही ठपका ठेवला होता. मात्र, आतापर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही.पुणे व पिंपरी-चिंचवड परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करून २००७ मध्ये पीएमपी ही कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना बढती देताना किंवा नव्याने निर्माण केलेल्या जागांवर बढतीने नेमणूक करताना दोन्ही संस्थांमधील त्या-त्या संंवर्गामधील पात्र व सेवाज्येष्ठ सेवकांची त्या-त्या जागांवर नेमणूक होणे आवश्यक आहे. मात्र, कंपनी स्थापन झाल्यानंतर असे कोणतेही निकष न पाळता काही कर्मचाऱ्यांना बढती व वेतनवाढ देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या १५ आॅक्टोबर २००७ रोजी झालेल्या दुसऱ्याच बैठकीत चार पदांची निर्मिती करण्यात, तर १० पदांवरील कर्मचाऱ्यांना बढती व वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी या पदांना शासन मान्यता देईल या भरवशावर सहा महिने मुदतीकरिता हंगामी नियुक्त्या व सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याचे ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.ठरावानुसार तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी २३ आॅक्टोबर २००७ रोजी संबंधित कर्मचाऱ्यांची बढती व वेतनवाढीचा आदेश काढला. या आदेशामध्येही संबंंधित बढती व वेतनवाढ दि. १ आॅक्टोबर २००७ ते ३१ मार्च २००८ या सहा महिन्यांपुरतीच असून, मुदत संपल्यानंतर पदानवत करण्यात येईल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. ही मुदत संपल्यानंतर अध्यक्षांनी ४ एप्रिल २००८ रोजी १३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व वेतनश्रेणी कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाची मान्यता नसताना प्रशासकीय पातळीवर या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. या वेळी कामगार संघटनांनी या नियुक्त्यांना विरोध केला. त्यावर तत्कालीन अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी केलेल्या तपासणीत या नियुक्त्या करताना अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार त्यांनी २३ मे २००५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव मांडला होता.(प्रतिनिधी)संचालक मंडळाची मान्यता न घेता केलेल्या नियुक्त्यांसाठी आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. बिंदू नियमावली व सेवाज्येष्ठता निश्चित झालेली नसताना बेकायदेशीरपणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कामगार युनियनचे विभागीय सचिव सुनील नलावडे यांनी केली आहे.दि. १५ मे २०१५ रोजी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रशासकीय अधिकारी संतोष माने यांना पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे आवश्यक माहिती द्यावी व अहवाल घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर पुरेशी कार्यवाही झालेली नाही.तत्कालीन अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी संचालक मंडळासमोर मांडलेल्या विषयातील मुद्दे राज्य शासनाची पुढे मान्यता न घेता या पदावर महामंडळातील अधिकाऱ्यास नेमणुकी देणे, तसेच नियुक्तीनंतर शासनाच्या किंवा संचालक मंडळाच्या मान्यतेविना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली.सहा महिने कालावधीसाठी अंतरिम स्वरूपात तात्पुरती मान्यता दिलेली असतानाही संचालक मंडळाची मान्यता न घेता या पदोन्नत्या व सुधारित वेतनश्रेणी कायम करण्यात आल्या. काही अधिकारी नियुक्त केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करीत नाहीत.काही पदांसाठी पदोन्नतीचे निकष किंवा अंतर्गत सरळसेवा भरतीचे निकष विचारात घेण्यात आले नाहीत. सर्व प्रकरणांची तपासणी करून ज्या प्रकरणांमध्ये अनियमितता आहे, अशा प्रकरणी दिलेल्या नियुक्त्या रद्द करणे क्रमप्राप्त आहे.