पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवारांची मतदारापर्यंत पोहोचण्याची धामधूम सुरू आहे. दसऱ्यानंतर रविवारची सुटी आणि बकरी ईदचा मुहूर्त साधत उमेदवारांनी गाठीभेटी व प्रमुख नेत्यांच्या सभासाठी धडपड केल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेस आघाडी व युती तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक मतदारसंघात संबंधित पक्षाच्या उमेदवारीची तयारी झालेली नव्हती. अचानक पक्षाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीला शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट व हडपसर मतदारसंघातून व काँग्रेसला वडगावशेरी, कोथरूड, पर्वती व खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत आहेत. तर, शिवसेनेला तयारी नसताना कसबा, पर्वती, खडकवासला व शिवाजीनगर येथून निवडणूक लढवावी लागली. त्याचप्रमाणे भाजपाला कोथरूड, हडपसर, वडगावशेरी व कॅन्टोन्मेंटची निवडणूक पहिल्यादांच लढवावी लागत आहे. (प्रतिनिधी)
प्रचारासाठी साधला सण, सुट्यांचा मुहूर्त
By admin | Published: October 06, 2014 6:27 AM