पुणे : वेळेत भाडे न देणाऱ्या तसेच करार कालावधी संपल्यानंतर सुधारीत दराने भाडेकरार न करणाºया पाच भाडेकरूंच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केली आहे. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहील, अशीमाहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीने काही मिळकती खासगी भाडेकरूंना भाडेकराराने दिल्या आहेत. मात्र, काही भाडेकरूंनी वेळेत भाडे दिलेले नाही. तसेच सुधारीत भाडेकरारही केलेले नाहीत. अशा भाडेकरूंवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सुरूवातीला पाच भाडेकरूंना देण्यात आलेल्या मिळकती सील करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे सुधारीत भाडेदराने जीएसटीसहसुमारे ३ कोटी २० हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये मोटे शिक्षण संस्थेकडे सर्वाधिक सुमारे २ कोटी ४८ लाख रुपयांचीथकबाकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली.मिळकती सील करण्यात आलेले भाडेकरूभाडेकरू थकबाकी सूरज साळुंके २४ लाख १६ हजार ६८०राहुल मधुकर सैदाणे १४ लाख ८० हजार ४८९दि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ व्हॅल्युअर्स १८ लाख ७२ हजार १२९न्यू गोल्डन कार्गो कॅरिअर १३ लाख ३९ हजार ५३६मोटे शिक्षण संस्था २ कोटी ४८ लाख ५ हजार १३४