पुणे : राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये पुन्हा वाढले. गेल्या वर्षी ते पुन्हा घटले. उदारीकरणाच्या धोरणामुळे कारखान्यांमध्ये होत असलेले आऊटसोर्सिंग, मोठ्या प्रमाणात झालेले अत्याधुनिकीकरण आणि कंत्राटी पद्धतीने केली जाणारी नोकरभरती ही कारणे त्यामागे असल्याचे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखानेच बंद होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही अन्याय असला तरी सबुरीचे धोरण घेत असल्याचे चित्र आहे. एका स्थित्यंतराच्या काळामधून कामगार चळवळी जात आहेत. कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक श्रमांमधून वस्तू उत्पादन करणे. ती स्थिती उदारीकरणाच्या काळात संपली. आऊटसोर्सिंग केले जाऊ लागले. अधिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये ५ टक्के कायमस्वरुपी कामगार उरले. ९५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करू लागले. त्यांनी दरवर्षी आपले कंत्राट होईल की नाही, या भीतीने १२ ते १६ तास काम करणे अंगवळणी पाडून घेतले आहे. सध्याच्या भांडवलशाहीचा वरचष्मा असलेल्या काळात कामगार चळवळींना नेमके काय केले पाहिजे, याचा दृष्टिकोन नाही. नेत्यांना या परिस्थितीचे आकलन नाही. पगार, बोनस, ओव्हरटाईम, कामाचे तास या झापडबंद विचारांमधून बाहेर पडून कामगारांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, असे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांवरचे वाढते ताणतणाव, कामाचे वाढलेले तास आदी बाबींवर ते म्हणाले, की १८८६ नंतरच्या दीडशे वर्षांमध्ये भांडवलशाही प्रचंड वेगाने पुढे गेली आहे. तिचे स्वरूप समजावून घेऊन नवा लढा उभारला पाहिजे. अजेंडा निर्माण केला पाहिजे. भांडवलदारांनी स्पेक्ट्रम, सोलर एनर्जीवर मालकी निर्माण केली आहे. स्पेक्ट्रम्ज मध्ये वायू-ध्वनीच्या ज्या लहरी दिसत नाहीत, त्यावर मालकी प्रस्थापित झाली. या मालकीवरुन आपल्या देशात भ्रष्टाचारही झाला. सोलर एनर्जी कोणाच्या मालकीची आहे? विंड मिल्स उद्योगांमध्ये कच्च्या मालाची गरज नाही. उत्पादनाची पूर्वअट विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हीच आहे. वारा कोणाच्या मालकीचा? पण तिच्यावरही भांडवलदारांनी हक्क प्रस्थापित केला आहे. नारायण सुर्वेंची कविता आहे, बघता बघता सूर्य बाजारात आला. ती खरीच ठरत आहे. त्यामुळे केवळ १ मे कामगार दिन साजरा करण्यापेक्षा नवी आव्हाने समजावून घेऊन नवी दृष्टी निर्माण करून कामगार चळवळींनी आक्रमक झाले पाहिजे.पुणे : राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये पुन्हा वाढले. गेल्या वर्षी ते पुन्हा घटले. उदारीकरणाच्या धोरणामुळे कारखान्यांमध्ये होत असलेले आऊटसोर्सिंग, मोठ्या प्रमाणात झालेले अत्याधुनिकीकरण आणि कंत्राटी पद्धतीने केली जाणारी नोकरभरती ही कारणे त्यामागे असल्याचे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखानेच बंद होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही अन्याय असला तरी सबुरीचे धोरण घेत असल्याचे चित्र आहे. एका स्थित्यंतराच्या काळामधून कामगार चळवळी जात आहेत. कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक श्रमांमधून वस्तू उत्पादन करणे. ती स्थिती उदारीकरणाच्या काळात संपली. आऊटसोर्सिंग केले जाऊ लागले. अधिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये ५ टक्के कायमस्वरुपी कामगार उरले. ९५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करू लागले. त्यांनी दरवर्षी आपले कंत्राट होईल की नाही, या भीतीने १२ ते १६ तास काम करणे अंगवळणी पाडून घेतले आहे. सध्याच्या भांडवलशाहीचा वरचष्मा असलेल्या काळात कामगार चळवळींना नेमके काय केले पाहिजे, याचा दृष्टिकोन नाही. नेत्यांना या परिस्थितीचे आकलन नाही. पगार, बोनस, ओव्हरटाईम, कामाचे तास या झापडबंद विचारांमधून बाहेर पडून कामगारांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, असे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांवरचे वाढते ताणतणाव, कामाचे वाढलेले तास आदी बाबींवर ते म्हणाले, की १८८६ नंतरच्या दीडशे वर्षांमध्ये भांडवलशाही प्रचंड वेगाने पुढे गेली आहे. तिचे स्वरूप समजावून घेऊन नवा लढा उभारला पाहिजे. अजेंडा निर्माण केला पाहिजे. भांडवलदारांनी स्पेक्ट्रम, सोलर एनर्जीवर मालकी निर्माण केली आहे. स्पेक्ट्रम्ज मध्ये वायू-ध्वनीच्या ज्या लहरी दिसत नाहीत, त्यावर मालकी प्रस्थापित झाली. या मालकीवरुन आपल्या देशात भ्रष्टाचारही झाला. सोलर एनर्जी कोणाच्या मालकीची आहे? विंड मिल्स उद्योगांमध्ये कच्च्या मालाची गरज नाही. उत्पादनाची पूर्वअट विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हीच आहे. वारा कोणाच्या मालकीचा? पण तिच्यावरही भांडवलदारांनी हक्क प्रस्थापित केला आहे. नारायण सुर्वेंची कविता आहे, बघता बघता सूर्य बाजारात आला. ती खरीच ठरत आहे. त्यामुळे केवळ १ मे कामगार दिन साजरा करण्यापेक्षा नवी आव्हाने समजावून घेऊन नवी दृष्टी निर्माण करून कामगार चळवळींनी आक्रमक झाले पाहिजे.१९ व्या शतकाच्या अखेरीस किमान १० ते १६ तास काम करणे बंधनकारक होते. त्यामुळे कामगार वर्ग ८ तास कामाच्या मागणीसाठी संघर्ष करत होता. १ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात १३ हजार व्यवसायांमधील ३ लाख कामगार ८ तासांच्या कामाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. ४० हजार कामगार या मागणीसाठी संपावर गेले. तेव्हापासून १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अस्वस्थता हवीच : पाटणकरमाहिती-तंत्रज्ञान युगामध्ये कामगार आणि भांडवलदार संबंध बदलले आहेत. कामगारांना छुप्या पद्धतीने पुढे आलेली नवी भांडवलशाही समजलेली नाही. जगण्यासाठी गरीब कष्टकऱ्यांना कचरा आमच्या हक्काचा’ अशी घोषणा पुण्यासारख्या शहरात द्यावी लागली. सध्याच्या परिस्थितीविषयी अस्वस्थता निर्माण होत नाही, तोपर्यंत कामगारांची स्थिती बदलणार नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी येथे सांगितले.
संप, टाळेबंदीचे प्रमाण वेगाने घटले
By admin | Published: May 01, 2017 1:56 AM