पुणे: महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून एकाच मिळकतीसाठी दोनदा मिळकतकर लावलेल्या ८४ प्रकरणातील २० कोटी १३ लाख रुपयांचा वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याची परवानगी द्यावी,असा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. महापालिकेकडून शहरातील मालमत्तांसाठी मिळकतकर वसूल केला जातो. परंतु यामध्ये विविध कारणामुळे काही मिळकतीचा कर वसूल होत नाही. यात प्रशासनाकडूनच एकाच मिळकतींना दोन वेळा बिल देण्यात आल्याने एकच बिलाची रक्कम भरली जाते. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डला एक बिल न भरल्याने थकबाकी दाखवली जाते. शहरामध्ये अशी अनेक प्रकरणे असून, यामुळे दर वर्षी महापालिकेच्या मिळकतीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे आकडेवारी वरून दिसते.याशिवाय दरवर्षी महापालिकेकडे दुबार नोंद झालेल्या मिळकतींची थकबाकी वाढत असून, थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करूनही ही रक्कम वसूल होत नसल्याने एका मिळकतीची थकबाकी शून्य करण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिका कायद्यात यासाठी तरतूद असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून हे करता येते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील ८४ प्रकरणातील २० कोटी १३ लाख रुपयांचा वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याची परवानगी द्यावी,असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:25 PM
प्रशासनाकडूनच एकाच मिळकतींना दोन वेळा बिल देण्यात आल्याने एकच बिलाची रक्कम भरली जाते. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डला एक बिल न भरल्याने थकबाकी दाखवली जाते.
ठळक मुद्देएकाच मिळकतींना लावलाय दोन वेळा मिळकतकरपालिका आयुक्तांना रक्कम वसूल होत नसल्याने एका मिळकतीची थकबाकी शून्य करण्याचे अधिकार ८४ प्रकरणातील २० कोटी १३ लाख रुपयांचा वसूल न होणारा मिळकत कर रद्द करण्याचा प्रस्ताव