शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आर्थिक मंदी अन् रेरामुळे घटले बांधकाम प्रस्ताव ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:38 PM

रेरा कायदा आणि जीएसटी आल्यामुळे व्यवसायाचे कंबरडे मोडल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देउत्पन्नात घट : जीएसटीमुळे बुडत्याचा पाय खोलातपुण्यामध्ये आयटी कंपन्यांचे आगमन होऊ लागल्यावर पुण्याच्या उपनगरांचा झपाट्याने विस्तारव्यवसायाला फटका : अनेक ठिकाणी टेकडीफोड सुरू

 - लक्ष्मण मोरे -पुणे : गेल्या काही वर्षांपासून असलेल्या आर्थिक मंदीमुळे पालिकेकडे येणारे बांधकाम प्रस्ताव कमी झाले होते. परंतु, रेरा कायदा लागू झाल्यापासून पालिकेकडे परवानगीसाठी येणाऱ्या प्रस्तावांमध्ये जवळपास ३० टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाला ठरवून देण्यात आलेले आर्थिक लक्ष्यही साध्य करता येत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे अधिकृत बांधकामांच्या प्रस्तावांचे प्रमाण घटत चालले असतानाच अनधिकृत बांधकामे जोमाने उभी राहत असल्याचे चित्र पुण्याच्या भोवताली दिसते आहे.पुण्यामध्ये आयटी कंपन्यांचे आगमन होऊ लागल्यावर पुण्याच्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला. विमाननगर, खराडी, कल्याणीनगर, हिंजवडी आदी परिसरात बांधकामाची लाटच आली. यासोबतच मगरपट्टा आणि नांदेड सिटीसारख्या टाऊनशिप उभ्या राहिल्या. विशेषत: हवेली तालुक्यात बांधकामाचा वेग प्रचंड होता. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी शहरात बांधकाम व्यवसायात मोठी तेजी आली होती. या तेजीचा फायदा घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी शहरासह उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागाच्या सीमा परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या. यातूनच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायही वाढत गेला. एका पाठोपाठ एक अशा टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. सुरुवातीला प्रतिसाद मिळालेला हा व्यवसाय मात्र गेल्या काही वर्षांत आर्थिक मंदीमुळे कमी होत चालला होता. त्यातच आता रेरा कायदा आणि जीएसटी आल्यामुळे व्यवसायाचे कंबरडे मोडल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सदनिका रिकाम्या पडलेल्या असतानाही घरांच्या किमती मात्र अद्यापही कमी होत नसल्याचे चित्र आहे. घरांच्या मागणीअभावी या व्यवसायातील गुंतवणुकीचा ओघ घटल्याचेही दिसत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दरवर्षी नवीन आणि पुनर्विलोकनासाठीचे प्रस्ताव दाखल होत असतात. या प्रस्तावांची पडताळणी करून तपासणी करून परवानग्या देण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जाते. बांधकाम विभागाकडून इमारत नकाशा मंजुरी, लेआउट मंजुरी, विस्तार, भोगवटा प्रमाणपत्र, जोते तपासणी प्रमाणपत्र, पुन्हा मुदत वाढविणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर), फास्ट ट्रॅक प्रणालीमार्फत बांधकाम परवानगी देणे आदी प्रकारची कामे चालतात. परंतु, मागील चार वर्षांत पालिकेकडे मंजुरीसाठी येणाऱ्या नव्या प्रस्तावांचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे. आर्थिक मंदी आणि त्यापाठोपाठ रेरा, नोटाबंदी, जीएसटी आणि वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदार धास्तावल्याचे चित्र आहे. ...पालिकेचे घटत चाललेले उत्पन्नवर्ष    अपेक्षित     प्रत्यक्ष     टक्केवारी    उत्पन्न (कोटीत)    उत्पन्न (कोटीत)२०१५-१६    ७५१    ७४४    —२०१६-१७    १०४५    ७४४    ५०२०१७-१८    ११६५    ५८०    ५०२०१८-१९    ८१५    ६५४    ८०.............पालिकेकडील दाखल प्रस्ताव .वर्ष    एकूण दाखल     नवीन     प्रस्ताव    प्रस्ताव२०११-१२    ४,६२४    १,७१८२०१२-१३    ४०८७    १३९४२०१३-१४    ४२८८    १२२८२०१४-१५    ४१५३    ११२६२०१५-१६    ४५११    १२०३२०१६-१७    ३९५३    ७६०२०१७-१८    ३८२६    ८५२२०१८-१९    ४१८२    ८८७.....व्यवसायाला फटका : अनेक ठिकाणी टेकडीफोड सुरूमंदीच्या झळा सोसत असतानाच रेरा कायदा आल्यापासून बांधकाम व्यावसायिक अधिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. जीएसटीमुळेही व्यवसायाला फटका बसू लागला आहे. अनेक व्यावसायिकांना गृहप्रकल्पासाठी काढलेल्या कर्जाचे व्याज भरत बसावे लागत आहे. या  व्यवसायावर अवलंबून असलेल्या सिमेंट विक्रेते, हार्डवेअर, वीज, वाळू, डस्ट व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. .......पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसह पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये बांधकामांना याच यंत्रणांची परवानगी आवश्यक आहे. परंतु, उपनगरांसह शहराच्या सीमाभागात ग्रामपंचायत सँक्शनच्या नावाखाली सर्रासपणे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. अनेक ठिकाणी टेकड्यांची लचकेतोड सुरू आहे. परंतु, या बांधकामांमधील सदनिका अत्यंत कमी किमतीत मिळत असल्याने त्या खरेदी करण्याचे प्रमाणही मोठे आहे. .........

टॅग्स :PuneपुणेRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017GSTजीएसटीbusinessव्यवसाय