आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकीवारी कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी ११ डिसेंबरला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. या तिन्ही दिंड्या ८ डिसेंबरला एसटीने आळंदीत दाखल होणार आहेत. तत्पूर्वी, पुण्यात सोमवारी (दि.३०) कार्तिकी वारीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकिय बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाच्यावतीने आळंदीत संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून ६ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
आळंदीत कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:20 AM