पुणे : शहरातील खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी त्यांना १ लाख रूपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे देण्यात आला आहे. त्याचबरोबर परदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन खेळाडूंना अशी मदत करावी, असाही प्रस्ताव समितीसमोर आहे.नगरसेवक योगेश समेळ व हरिदास चरवड यांनी हा प्रस्ताव दिला आहे. शहराचा नावलौकिक देशापरदेशात करणार्या खेळाडूंना मदत करण्यासाठी महापालिकेची काहीही योजना नाही. परदेशात जाण्याचा खर्च अनेक खेळाडूंना परवडत नाही व पात्र असूनही त्यांना परदेशात जाता येत नाही, किंवा गेलेच तर कुटुंबाला कर्जबाजारी व्हावे लागते. त्यामुळ अशी मदत करणार्याची योजना तत्काळ सुरू करावी अशी मागणी या दोन्ही नगरसेवकांनी केली आहे. हवे असेल तर अशा खेळाडूंसाठी उत्पनाची अट घालावी असेही त्यांनी सूचवले आहे. या दोन नगरसेवकांशिवाय सुशिल मेंगडे, राजेश बराटे व वृषाली चौधरी या नगरसेवकांनी काही खेळाडूंची नावे देत त्यांची निवड परदेशातील स्पर्धेसाठी झाल्यामुळे त्यांना मदत करावी असा प्रस्ताव दिला आहे. साक्षी रवींद्र जाधव, साक्षी सातेरे पाटील व अभिजीत खोपडे या तीन खेळाडूंची जागतिक स्तरावर इजिप्त येथे होणार्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत महापालिकेच्या वतीने करावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. समितीच्या येत्या मंगळवारच्या सभेत या विषयावर चर्चा होईल.
खेळाडूंच्या मदतीसाठी स्थायीकडे १ लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:07 PM
शहरातील खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी त्यांना १ लाख रूपयांपर्यंतची मदत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे देण्यात आला आहे.
ठळक मुद्देनगरसेवक योगेश समेळ व हरिदास चरवड यांनी हा प्रस्ताव दिला आहे.सुशिल मेंगडे, राजेश बराटे व वृषाली चौधरी या नगरसेवकांनी काही खेळाडूंची नावे देत त्यांची निवड परदेशातील स्पर्धेसाठी झाल्यामुळे त्यांना मदत करावी असा प्रस्ताव दिला