लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील छोट्या जत्रा-यात्रा, उरुस यांना स्थानिक परिस्थिती आणि शासनाने कोरोना महामारीच्या प्रतिबंध संदर्भात निर्गमित केलेले आदेश, नियम अटी विचारात घेऊन परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यात प्रस्ताव येईल, तशी गावांना मिळणार जत्रा-यात्रांना देणार परवानगी देणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. जयश्री कटारे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रा-जत्रा वळगुस यांच्यावर बंदी घालण्यात आली. मात्र या यात्रांमध्ये लहान मुलांची खेळणी मनोरंजनाचे पाळणे तसेच छोटी-मोठी दुकाने व्यावसायिक यांनी यात्रांना परवानगी देण्याची मागणी केली आहे यासंदर्भात विभागीय आयुक्तालयाने कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून स्थानिक परिस्थिती विचारात घ्यावी तसेच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी निर्मित केलेल्या आदेशातील नियम आणि अटी विचारात घेऊन त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. मोठ्या यात्रा उत्सव तेथे उपस्थित होणारा जनसमुदाय विविध जिल्हे आणि विभिन्न राज्यातील लोक यात्रेसाठी येणार आहेत. अशा ठिकाणी मान्यता द्यावयाची झाल्यास विभागीय आयुक्तालयाला परिपूर्ण प्रस्ताव उपाययोजना यांचा संपूर्ण कृती आराखडा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत कटारे यांनी सांगितले, पुणे जिल्ह्यात पाडव्यानंतर जत्रा-यात्रांना हंगाम सुरू होतो. यामुळे ज्या गावांचा प्रस्ताव येतील त्याप्रमाणे परवानगी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.