पुणे : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर करता येणार आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरु केला आहे. गतवर्षी अठरा जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़ प्रत्येक कॅटेगरीबाबतचे निकष अर्जामध्ये नमूद केलेले असून, अधिक माहितीसाठी ८८८८७५८६७६ या क्रमांकावर संपर्क साधावा़अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.मागील वर्षी ज्या सरपंचांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना या वर्षी त्याच कॅटेगरीमध्ये प्रस्ताव दाखल करता येणार नाही़पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन / ई-प्रशासन / लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. प्रवेशिका ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.‘लोकमत’ पुरस्कार ही सरपंचांसाठी मोठी संधीग्रामविकासाला चालना देण्यात ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ची महत्वपूर्ण भूमिका आहे़ गेल्या वर्षी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला़ चांगली कामे करणाऱ्या गावांचा मोठा सन्मान झाला़ त्यामुळे अनेक गावांना यातून प्रेरणा मिळत आहे़ चांगले काम करणाºया सरपंचांसाठी हा पुरस्कार मोठी संधी आहे़ सरपंचांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्याचे जे काम सरकारकडून होणं अपेक्षित होतं, ते ‘लोकमत’ने हाती घेतले आहे़ -योगिता गायकवाड, नागपूर,मागील वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या़
सरपंच अवॉर्डसाठी प्रस्तावांचा ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:29 AM