शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मसाला पिकातून आणली शेतीत समृद्धी

By admin | Published: October 24, 2016 1:13 AM

थील एका पदवीधर युवकाने आपल्या गावातीलच रांजणगावच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामवंत देशी व परदेशी कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही

संजय देशमुख, रांजणगाव गणपतीथील एका पदवीधर युवकाने आपल्या गावातीलच रांजणगावच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामवंत देशी व परदेशी कंपन्यांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पिके सोडून आधुनिक तत्रंज्ञानाच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग केले. आल्याचे मसाला पीक घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने शेती समृद्ध केली आहे. महेंद्र नामदेव साळुंके असे या हरहुन्नरी युवा शेतकऱ्याचे नाव असून, आपल्या पदवी शिक्षणाची किंचितही लाज न बाळगता त्यांनी पुणे-नगर महामार्गाला लागूनच असलेल्या आपल्या ३० गुंठे क्षेत्रात मसाला पिकात गणना होणाऱ्या आल्याचे पीक घेऊन परिसरात एक आगळेवेगळे पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यासाठी त्यांना आई मंदाबाई तसेच मित्र परिवाराचीही उत्तम साथ लाभली. नारायणगाव येथून स्थानिक जातीचे ४०० किलो आल्याचे खात्रीशीर निरोगी व रसरशीत बेणे विकत आणले. साधारणपणे महिना ते दीड महिनाभर हे बेणे जमिनीवर सावलीत ढीग करून ठेवले व त्यावर बारदानाने आच्छादन केले. नंतर दररोज पाणी शिंपडून बारदान ओले राहील, याची दक्षता घेतली. दरम्यानच्या काळात आले पिकाला मध्यम प्रतीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व भुसभुशीत जमीन आवश्यक असल्याने जमीन चांगली खोलवर नांगरून, कुळवून भुसभशीत केली. त्यात ६ ट्रॉली शेणखत टाकून चार फुटांवर सरी पाडली. लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व पालाशयुक्त वरखते दिली. वरंब्यावर २० सें.मी. अंतरावर ढीग करून ठेवलेल्या आल्याच्या बेण्यातून क ोंब आलेले २ ते ३ डोळे असलेल्या कंदाचे २५ ग्रॅम वजनाचे तुकडे करून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यात आली. लागवडीपूर्वी रोग व किडीपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी कंदाचे तुकडे बुरशीनाशकात बुडवून घेतले. पिकाला पाणी तसेच प्रवाही द्रवरूप खते देण्यासाठी वरंब्यावर ठिबक सिंचन संचाची व्यवस्था केली. पीक महिन्याचे झाल्यावर हलकीशी खुरपणी करून तण काढले. नंतर ४ महिन्यांनी तण काढून कंदाला मातीची भर दिली. साधारणपणे चांगला बाजारभाव असल्यास ६ महिन्यांनंतर आल्याचे पीक काढता येते; मात्र बाजारभाव नसल्यास ते पीक तसेच जमिनीत ठेवल्यास कंद पोसून उत्पन्नात भर पडते. आल्यापासून सुंठ तयार करण्याबरोबरच दररोजच्या आहारात, मसाला पदार्थ, औषधे, आलेपाक तसेच संस्करण प्रक्रिया उद्योगात आल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.