‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

By श्रीकिशन काळे | Published: August 19, 2024 07:20 PM2024-08-19T19:20:11+5:302024-08-19T19:20:26+5:30

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत.

Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar | ‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

पुणे: पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीच्या मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून परिसराचे सपाटीकरण करणे सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून, येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. ‘लाडके डोंगर योजना राबवून हिंगण्याला वायनाड होण्यापासून थांबवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि तहसीलदार यांना केली आहे.

तसेच पालकमंत्री अजित पवार यांनाही पत्र पाठवून लाडकी बहीण योजनेसारखी ‘लाडका डोंगर योजना” आखून पुणेकरांचे, पर्यावरणाचे व पुण्याला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे रक्षण करावे अशी विनंती केली आहे. घरत म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे. तसेच तळजाईच्या डोंगरातून येणारे धबधबे, जिवंत झरे, प्रवाह यांचे डोंगर फोडकरुन नुकसान केले आहे. डोंगरफोडीतून गौणखानिज मुरूम उत्खनन करुन शेकडो ट्रक विकले गेले आहे. त्याला जबाबदार असलेल्यांवर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार टेकड्यांवर अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत, परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत. अशा टेकड्या फोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केली जात आहे. सदर प्लॉटिंग करत असताना जागा मालक व विकसक यांनी तळजाई टेकडीच्या वन विभागाच्या भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटीकरण केले आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाला तर वनविभागची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.