पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या वीसहून अधिक प्रवासी गाड्यांना आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) संरक्षण देत आहे. यात लांब पल्ल्याच्या विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. प्रत्येक गाडीत चार ते पाच सशस्त्र आरपीएफचे जवान आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षा अधिक चांगली होण्यास मदत होईल.
पुणे रेल्वे विभागात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच काही ठिकाणी सिग्नल तोडण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर आरपीएफचे जवान पुणे ते अहमदनगर, पुणे ते मिरज या सेक्शनमध्ये प्रवासी गाडीत गस्त घालतील. यात पुणे-दानापूर, दानापूर-पुणे, जोधपूर-बेंगळुरू, अजमेर-म्हैसूर, तिरुवनवेली-दादर, गांधीधाम-बेंगळुरू आदींसह अन्य गाड्यांचा समावेश आहे. आरपीएफसह काही गाड्यांना लोहमार्ग पोलीस देखील सरंक्षण देत आहे.