- राजानंद मोरेपुणे - प्रत्येकासाठीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधीच उदासीन आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वर्षभरातील चारही बैठकांना बहुतेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारली आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना रस्त्यांची सुरक्षा नकोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.केंद्रीय सडक परिवहन महामार्ग मंत्रालयाने सप्टेंबर २०१७मध्ये पूर्वीची जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बरखास्त करून नवीन समित्या स्थापन करण्याची अधिसूचना काढली. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये केवळ विविध विभागांच्या अधिकाºयांचा समावेश होता.पण, नवीन समित्यांची व्याप्ती वाढवून त्यामध्ये सर्व संबंधित विभागांच्या अधिकाºयांसह जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांनाही सदस्य करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हातील ४ लोकसभा खासदारांसह २१ विधानसभा आमदार समितीचे सदस्य आहेत. तसेच, राज्यसभा खासदार व विधान परिषद आमदारही निमंत्रित सदस्य आहेत.त्यानुसार पुणे जिल्ह्याची समिती खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखालीमागील वर्षी जानेवारी महिन्यात स्थापन करण्यात आली. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका झालेल्या आहेत.समितीची काही कामेजिल्हातील रस्ता सुरक्षेबाबत देखरेखरस्ते अपघातांची कारणे शोधून उपाययोजना करणेरस्ते सुरक्षा परिषदेला सूचना करणेब्लॅक स्पॉट शोधून उपाय सुचविणेरस्ता सुरक्षा योजना तयार करणेरस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसमितीतील सदस्यसर्व खासदार व आमदारजिल्हाधिकारीपोलीस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्षसर्व प्रांताधिकारीतीन एनजीओ प्रतिनिधीजिल्हा शल्यचिकित्सकशिक्षणाधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारीआरटीओ (सदस्य सचिव)जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा लोकप्रतिनिधींचा हजेरीपटपहिली बैठक - दि. २० जानेवारी २०१८उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटीलखासदार - अनिल शिरोळेखासदार - अमर साबळेआमदार - भीमराव तापकीरतिसरी बैठक - दि. २९ आॅगस्ट २०१८उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटीलखासदार - अनिल शिरोळेखासदार - अमर साबळेआमदार - भीमराव तापकीरदुसरी बैठक - दि. १८ एप्रिल २०१८उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटीलखासदार - अनिल शिरोळेखासदार - अमर साबळेचौथी बैठक - दि. १९ जानेवारी २०१९उपस्थिती - खासदार शिवाजीराव आढळराव-पाटीलखासदार - अनिल शिरोळेचारही बैठकांना अध्यक्षांसह केवळ खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. खासदार अमर साबळे यांनी तीन बैठकांना, तर आमदार भीमराव तापकीर यांनी दोन बैठकांना हजेरी लावली. याव्यतिरिक्त एकाही लोकप्रतिनिधीने या बैठकांकडे ढुंकूनही पाहिले नाही.रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यास या समितीला महत्त्व देण्यात आले आहे; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामध्ये समितीला कामांची व्याप्ती वाढविण्यात मर्यादा येत आहेत.
लोकप्रतिनिधींनाच नकोय रस्त्यांची सुरक्षा, जिल्हा समितीबाबत अनास्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:41 AM