बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा बारामतीत निषेध करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या जशास तसे उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने आयोजित निषेध सभेत काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी चांगले संस्कार, संस्कृती जपली. मात्र, आता आता मात्र आमच्या नेत्यांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर घरात घुसून मारु, हल्याचा सुत्रधार पोलिसांनी शोधावा, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, प्रशांत काटे, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, केशव जगताप, विश्वास देवकाते, इम्तियाज शिकीलकर, वनिता बनकर, नितीन शेंडे, सुभाष ढोले, धीरज लालबिगे, साधू बल्लाळ, शब्बीर शेख, आशिष जगताप, अनिल लडकत, तानाजी कोळेकर, सतीश देशमुख, नरेंद्र गुजराथी, दिलीप ढवाण, पाटील, अविनाश गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, विशाल जाधव, संतोष जाधव, नवनाथ बल्लाळ, सुनिता बगाडे, कॉंग्रेसचे अशोक इंगुले व वैभव बुरुंगले तसेच शिवसेनेचे विश्वास मांढरे, अॅड राजेंद्र काळे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.