बारामती : बरोबर काम करणार्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवण्यास विरोध केल्यावरून पत्नीला मारहाण, छळ केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एसटी कर्मचार्याच्या विरोधात गुन्हा झाला आहे. हा एसटी कर्मचारी बारामती एसटी आगारात कार्यरत आहे. याच आगारात नोकरीस असलेल्या महिला कर्मचार्याशी त्याचे अनैतिक संबंध आहेत. दि. २८ एप्रिलपासून दोघे पळून गेले होते. शनिवारी थेट त्या महिलेला घेऊन एसटी कर्मचारी घरी आला. त्या महिलेला घरात घेण्यास विरोध केल्यानंतर मारहाण केल्याची फिर्याद पत्नीने दाखल केली. एसटी कर्मचारी आरोपी उदयसिंह प्रल्हाद देशमुख (वय ३०, रा. जामदार रोड, बारामती कसबा) यास पत्नीच्या छळप्रकरणी अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून पती उदय हा मोबाईलवर चोरून त्या महिलेशी बोलत असल्याचे निदर्शनास आले होते. (वार्ताहर)
अनैतिक संबंधास विरोध; पत्नीचा छळ
By admin | Published: May 12, 2014 2:29 AM