पुणे : लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे़ त्यामुळे साहित्यिकांना येणाऱ्या धमक्यांच्या विरोधात साहित्य संमेलनामध्ये निषेधाचा ठराव मांडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ़ माधवी वैद्य यांनी रविवारी सांगितले़ मात्र, पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासंदर्भात उद्भवलेल्या वादाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्याचे त्यांनी टाळले़ साहित्यिकांना जिवे मारण्याची धमकी देणे योग्य नाही. विचारांचा सामना विचाराने व्हावा, असे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असे सांगतानाच सबनीसांनी जी भूमिका मांडली आहे, त्याच्याशी महामंडळाचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सबनीस यांना दिल्या जाणाऱ्या धमकीविरोधात निषेधाचा ठराव मांडणार का, असे विचारले असता हा विषय नियामक मंडळासमोर मांडला जाईल, मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. सबनीस त्यांच्याविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
साहित्यिकांना मिळणाऱ्या धमक्यांचा संमेलनात निषेध !
By admin | Published: January 11, 2016 2:35 AM