कोथरूड : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावात दलित समाजातील जाधव कुंटुंबातील 3 जणांना ठार मारण्यात आले. या घटनेचा कोथरूड भागातील महाराष्ट्र मागासवर्गीय परिवर्तन संघटना व रिपब्लिकन पार्टी (अ) कोथरूड विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला.
समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना समाजकंटकांच्या वतीने जातीय तेढ निर्माण केला जात असून, या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आंदोलने बंद होणार नसल्याचे विजय डाकले यांनी सांगितले.
या वेळी कैलास कदम, वसंत ओव्हाळ, तात्या कसबे, दादा खरात, पतित पावन संघटनेचे संतोष शेडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते. (वार्ताहर)
गुन्हेगारांवर कारवाई करा
4पुणो : जवखेडे खालसा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाचे मारेकरी हे अमानुष वृत्तीचे आहेत. असा कोणता गंभीर गुन्हा जाधव कुटुंबीयांनी केला होता की ज्याची शिक्षा अशा अमानुष पद्धतीने त्यांना दिली गेली, असा सवाल अॅड. जयदेव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.
4या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही. परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन लवकर मारेक:यांना पकडता येईल, तसा प्रयत्न तपास यंत्रणोने केला पाहिजे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणो दलितांवर घडलेल्या अत्याचारांच्या विरोधातील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. याच कायद्यातील तरतुदीप्रमाणो दलित अत्याचार प्रकरणांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालवणो आवश्यक आहे, असे गायकवाड म्हणाले.
आंबेडकर संघर्ष समितीतर्फे दाखविले काळे ङोंडे
4धनकवडी : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे या गावामध्ये झालेल्या तिन दलितांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा अद्यापर्पयत शोध न लागल्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव-दत्तनगर येथील बेलदरे पाटील चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सघ्ांर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.
4या प्रकाराचा लवकरात लवकर तपास लावावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली. या संदर्भातील निवेदन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत ¨शदे यांना देण्यात आले.
4या वेळी मानव अधिकार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकात मोरे, तसेच कार्यकत्र्यानी काळे ङोंडे, फलक दाखवत निषेध केला.