पुणे : बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु करण्यात याव्या, पेटा संस्थेवर बंदी आणून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे. शेकडो बैलगाड्यांसह विदर्भ, खानदेश सह पश्चिम महाराष्ट्रातुन बैलगाडी शर्यत मालक, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु करण्यात याव्यात, पेटा संस्थेवर बंदी आणून तिची आर्थिक चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर प्राणीमित्र अजय मराठे, मनोज ओसवाल, अनिल कटारिया यांच्या देखील आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, महाराष्ट्र प्राणी कल्याण बोर्डावर अशासकीय सदस्य म्हणून नेमणुक झालेल्या अॅड एन.जी. जयसिन्हा यांची नेमणुक रद्द करावी आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत. मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाल्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहे. शर्यत जर कायमची बंद झाली तर हे बैल निरुपयोगी होतील व एक दिवस नष्टही होतील अशी या आंदोलकांना भीती आहे. आजपर्यंत या बैलांबाबत कोणतेही ठोस धोरण सरकार किंवा प्राणिमित्र संघटनेकडे नाही असा आरोपही या आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
बैलगाड्यांची शर्यती सुरु कराव्यात या मागणीसाठी पुण्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:53 PM
शेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयाबाहेर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने अांदाेलन करण्यात येत अाहे. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत अांदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा अांदाेलकांकडून देण्यात अाला अाहे.
ठळक मुद्देशेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयासमाेर अांदाेलनबैलगाडा शर्यत सुरु करावी, पेटा संस्थेवर बंदी अाणावी या प्रमुख मागण्या