कात्रज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद ठेवण्यात आला होता. मात्र पुणे शहराला यातून वगळण्यात आले होते. मात्र तरीही येथील मराठा युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पित केली.कात्रज चौकात दुपारी ११.३० च्या सुमारास शेकडो युवक एकत्र आले. एक मराठा-लाख मराठाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. आंदोलक चौकात उभे राहून श्रद्धांजली अर्पित करणार होते. मात्र त्यामुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली असती.आंदोलकांनी घेतली काळजीस्वारगेट विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजीराव पवार व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी चौकात येण्यापासून आंदोलकांना अटकाव केला. त्यांनतर आंदोलकांनी कात्रज चौक ते भारती विद्यापीठ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली. ही रॅली निघाली त्यावेळी व्यापाऱ्यांनी तातडीने आपली दुकाने बंद केली. काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आंदोलकांनी कुठलीही अप्रिय घटना घडू दिली नाही.
कात्रजमध्ये आंदोलक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:06 AM