लष्कर (पुणे): कर्नाटक सरकारने शाळेत घातलेल्या बुरखाबंदी विरोधात पुणे शहर काँग्रेस समितीच्या वतीने कॅम्प मधील कोहिनुर हॉटेल चौकात निदर्शने झाली. सदर निदर्शनात कर्नाटक भाजप सरकारने शाळेतील मुस्लिम मुलींच्या बुरखा घालण्यावर केलेली बंदी ही संविधान विरोधी असून, यामुळे मानवी मूळ हक्कावर गदा आणत असून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत असे बागवे म्हणाले. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने झाली तर नगरसेवक व गटनेते अरविंद शिंदे यांनी केंद्रातील आणि भाजप सरकार टीका केली.
यावेळी अनेक मुस्लिम महिला बुरखा घालून बुरखाबंदीला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी होत 'मेरा हिजाब मेरा अधिकार' या घोषणा देत सहभागी झाल्या होत्या. बुरखा घालून आलेल्या मुस्लिम युवती, विद्यर्थिनींनी बुरख्याच्या समर्थनार्थ आपले विचार हिंदी व इंग्रजी भाषणातून यावेळी व्यक्त करीत संविधानाचा जयघोष केला. भाजप सरकारचा मनुवादी कट कारस्तान काँग्रेस पक्ष कधीच सध्या होऊ देणार नाही असे अभय छाजेड म्हणाले.
या आंदोलनात संगीत तिवारी, नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, मेहबूब नदाफ, मंजूर शेख, चांदबी नदाफ, क्लामेंट लाजर्स, बी जे कोळसे पाटील, योगेश उकिरडे, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे राजेंद्र शिरसाठ, आबा बागुल, सुजित यादव, आणि मोठ्या प्रमाणावर स्त्री-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.