नारायणगाव : जिल्हा परिषद गटातील मतदारसंघात असणाऱ्या दलित वस्त्यांमध्ये विकासकामे न झाल्यास हा माझा कमीपणा आहे. दलित वस्त्यांमध्ये विविध कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आपण केवळ कामे सूचवा व त्या कामांची मागणी करा, आपल्या मागणीनुसार आपल्या वस्त्यांमध्ये विकासकामे करून देण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालुका, प्रबुद्ध भारत फाउंडेशन लेणी संर्वधन टीम, बौद्ध विकास मंडळ आणि विजय सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांचे हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष दिनेश वाव्हळ, बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष अर्जुन वाव्हळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील वाव्हळ, ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथ वाव्हळ, विजय फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा वाव्हळ, डाॅ. पंकज वाव्हळ, वंचित आघाडीचे सचिव गिरिराज वाव्हळ, माजी ग्रामपंचायत सदस्या वंदना वाव्हळ, ज्येष्ठ मार्गदर्शिका रमा वाव्हळ, पुष्पा रोकडे, विद्या वाव्हळ, आशा खरात, रंजना वाव्हळ, नंदा सांगळे, सर्पमित्र नागेश्वरी केदार, गोपीजी खंडे, उमेश वाघांबरे, संकेत क्षीरसागर, दाविद इंगळे, विकी खंडे, संदीप उबाळे, पंकज खरात, सूरज वाव्हळ, विक्रम वाव्हळ, अक्षय खंडे, संतोष डोळस, अशोक रोकडे, गोटू वाव्हळ, किरण खंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन वंचित आघाडीचे जिल्हा सहसचिव गणेश वाव्हळ यांनी केले तर आभार बाळा वाव्हळ यांनी मानले. अक्षय वाव्हळ, पवन वाव्हळ, विकी खंडे, पूनम वाव्हळ, गोटू वाव्हळ, तन्वी काशिकेदार, मनूश्री वाव्हळ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
चौकट......
डाॅ. सुषमा खंडे यांच्याकडून ज्योती रोकडे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. दिनेश वाव्हळ यांच्याकडून हेमलता जावळे यांना द्वितीय बक्षीस कपसेट, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. अप्पा सोनवणे यांच्याकडून मनाली वाव्हळ यांना तृतीय बक्षीस हॅण्डबॅग, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. रांगोळी स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून ए. एस. रोकडे यांनी काम पाहिले.
२५ नारायणगाव बुचके
बक्षीस वितरण समारंभात बोलताना आशा बुचके. व्यासपीठावर मान्यवर.
250821\img-20210824-wa0255.jpg
?????????? ?????? ??? ?????