यासंदर्भात डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले की, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर आंदोलने करुन, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक सरकारला मग ते युती सरकार असो, की महाविकास आघाडी सरकार असो, धनगर समाजाच्या भावना आंदोलने करुन सरकारपर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न केला आहे. त्या आंदोलनातूनच मागील सरकारने 'जे अदिवासींना ते धनगरांना' याप्रमाणे धनगर समाजाला अदिवासींच्या धर्तीवरील २२ योजनेंचा शासननिर्णय देखील काढलेले आहेत. यानुसारच एक हजार कोटीची तरतूद शासनाच्या माध्यमातून करणे अत्यंत गरजेचे आहे.
धनगर समाजाच्या विकासासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ५ योजनांसाठी ५० कोटींचा निधी खालील योजनांसाठी मंजूर आहे. त्या योजनांमध्ये धनगर समाजातील वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंमसाह्य योजना सुरु करणे, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्यात पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या विभागीय स्तरावर नवीन शासकीय वसतिगृह सुरु करणे यासारख्या आदी मागण्यांचे निवेदन अजित पवार यांना दिले असल्याचे तरंगे म्हणाले.
फोटो ओळ : डॉ.शशिकांत तरंगे