शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 11:58 PM

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे.

चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्याआगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे. त्याचबरोबर देशात स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. जेणेकरून तरुणांचे शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर कमी होईल. सोबतच ज्या क्षेत्राचे शिक्षण घेतले त्यानुसारच रोजगार मिळावा. उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी वाढीव शिष्यवृत्ती द्यावी. परंतु सध्याची परिस्थिती बघता रोजगार आणि शिक्षण हे मुद्दे निवडणूक प्रचारात मागे पडले आहेत.- राहुल दळवी, विद्यार्थीआमची मागणी पूर्ण व्हायला हवीआम्हाला कॉलेजला दुचाकीवरून यावे लागते. त्यामुळे त्याला इंधन लागतंच. त्याचे दर आवाक्यात आणणं ही आमची प्रामुख्याने अपेक्षा आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत, रोजच्या वाढत्यामहागाईनं आमच्यापालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता जगणं अवघड झालं आहे. तर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, महागाई कमी व्हावी ही तर आमची कित्येक वर्षांपासूनची मागणीआहे. आता तरी आमची मागणी पूर्ण होईल, अशी इच्छा आहे.- गोपाळ ओझा, विद्यार्थीमहागाई कमीझालीच पाहिजेआम्ही पहिल्यांदाच मतदान करतोय. महागाई खूप वाढत चालली आहे. दोन वेळेचं जेवण सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. देशातील जनतेला रोजगार देणारं सरकार असणं आवश्यक आहे. आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणात आवश्यक असलेल्या सवलती मिळणे बंद झाले आहे. त्या नियमित मिळणे आवश्यक आहे. विकास व उत्तम प्रशासन असा चहूबाजूने सर्वसमावेशक विचार करणारा नेता, खासदार आम्हाला हवाय. तरच बहुसंख्य युवक असलेल्या देशातील तरुणांचे प्रश्न सुटतील, असे वाटते.- अनिकेत मदने, विद्यार्थीउमेदवार शिक्षित असायला हवाआज आपल्याला राजकीय पक्ष, त्याने उभा केलेला उमेदवार हे पाहून मतदान करावं लागतं. उमेदवार हा उच्चशिक्षितच असला पाहिजे. आमचा खासदार तरुण असावा, त्यामुळे त्याने तरुणांचे प्रश्न समजून घ्यावेत, बेरोजगारीवर मात करून युवकांना शिलेदार म्हणून प्रोजेक्ट करणारा असावा. उमेदवार शिक्षित व प्रगल्भ असावा. स्थानिक पातळीवरील तरुण-तरुणी, नागरिक यांचे प्रश्न त्यांना समजतील आणि त्या दृष्टीने तसे उपक्रम राबविणारा नेता पाहिजे. तो उच्चशिक्षित असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगल्या योजना तो राबवू शकतो. - रोहित पांडे, युवकतरुणांना केंद्रस्थानीठेवून विचार करावानिवडणुका धर्म आणि जातिआधारित राजकारणावर केंद्रित झाल्या आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी व्यक्तिगत मुद्यांवरून चिखलफेक ही नेत्यांकडून राजकीय मंचावरून होताना दिसत आहे. ती बंद होणे आवश्यक आहे तरच देशातील वातावरण चांगले राहील. प्रत्येक पक्ष, भारत हा तरुणांचा देश, उद्याचे भविष्य आहे, असे सांगत असतो. परंतु वास्तवात राजकीय नेते आमच्याकडे केवळ मतदार म्हणून पाहतात. म्हणून या निवडणुकीत तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा विकास कसा होईल, या मुद्यांवर त्यांनी लक्ष द्यावे.- काजोल बोडरे, विद्यार्थी

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानPuneपुणे