शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

रिक्षाचालक ,पथारी व्यावसायिक यांच्यासह सर्व लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत द्या: गिरीश बापट यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 5:36 PM

रिक्षा चालक, पथारी व्यावसायिक यांचा व्यवसाय गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे.

पुणे: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला १५ दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकारने १५ मे पर्यंत दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे निश्चितच सर्वसामान्य नागरिक ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक किंवा बऱ्याच संख्येने असलेल्या घरेलू कामगारांच्या बँक खात्यात जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तातडीने जमा करण्यात यावी अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

बापट म्हणाले,कोरोना काळात केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवलं. तसेच राज्य सरकारने देखील लॉकडाऊन जाहीर करताना ज्या काही पॅकेजची घोषणा केली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच जे काही रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक व घरेलू कामगार आहेत त्यांच्या खात्यात तातडीने शासकीय आर्थिक मदत जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तयार असून प्रशासकीय यंत्रणेने तत्परतेने ही मदत पोहचवायला हवी. 

रिक्षा चालक, पथारी व्यावसायिक यांचा व्यवसाय गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे. मात्र आता  जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासह जे जे संबंधित अधिकारी आहे त्यांनी लाभार्थ्यांना ही शासकीय मदत लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांची मदतीसाठी भेट घेत पुढील चार दिवसात लाभार्थ्यांना ही आर्थिक मदत देण्यास सुरुवात करावी.

लसीकरणातील गोंधळ दूर करण्यासाठी नियोजन गरजेचे...

पुण्याची लोकसंख्या पाहता एकाच दिवसात सर्वांना लस देणे शक्य नाही. मात्र लसीकरणाची मोहीम राबविताना प्रशासकीय पातळींवर लसींचा पुरवठा व साठा यांचा अंदाज घेत नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना व्यवस्थित लस उपलब्ध होईल व केंद्रावरची विनाकारण होणारी प्रचंड गर्दी रोखता येईल असेही खासदार गिरीश बापट यांनी यावेळी सांगितले.

'सिरम'च्या आदर पुनावाला यांची भेट घेणार......

कोरोना काळात राज्य सरकार, आरोग्य विभाग, किंवा प्रशासकीय यंत्रणेला आम्ही सहकार्यच करत आहोत. मात्र अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे लसींच्या पुरवठ्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांची महापौर, पदाधिकारी यांच्या समवेत भेट घेणार आहे. यावेळी पुनावाला यांना पुण्यासाठी जास्तीत जास्त पुरवठा करण्यातबाबत विनंती करणार आहे.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या