दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, पुरंदर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरण केंद्र चालू झाले आहे. सध्या ४५ वयापुढे अशा लोकांसाठी ही लस शासनाच्या वतीने मोफत दिली जात आहे. असे असताना एकूण महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या पाहता शासनाने अनेक खासगी रुग्णालयांना २५० रुपये दराने सर्वसामान्य व्यक्ती, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, यांना विषाणूपासून धोका असतानादेखील पुरंदर तालुक्यात एकाही खासगी रुग्णालयात सशुल्क कोरोना प्रतिबंधात्मक लस केंद्र उभारले गेले नाही. ही केंद्रे तातडीने उभारावी. तसेच खासगी रुग्णालयातील अवाजवी दराने कोरोनाबाधितांकडून रक्कम उकळली जात आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, राजीव गांधी आरोग्य योजना यांचा देखील अंमल तालुक्यात कोणत्याही खासगी रुग्णालयात करावी, खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड हे राखीव ठेवण्याची व्यवस्था देखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार केली जावी. अशी मागणीही श्रीकांत ताम्हणे यांनी केली आहे.
खासगी रुग्णालयात सशुल्क लस उपलब्ध करा : ताम्हणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:10 AM