शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

घरी सोडण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी पीएमपी बस पुरवा; पालिका प्रशासनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:59 PM

दररोज घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या १० पासून ५० पर्यंत

ठळक मुद्दे सध्या शहरात जमावबंदी असून सर्व प्रकारच्या वाहनांना आणि वाहतुकीला बंदी

पुणे : डॉ. नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये चौदा दिवस राहिल्यानंतर ज्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत त्यांना घरी सोडण्यात येत आहे. अशा दररोज घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या १० पासून ५० पर्यंत आहे. या नागरिकांना घरी जाण्यासाठी सद्यस्थितीत वाहन मिळत नाही. त्यांच्यासाठी पीएमपीएमएलने बसची व्यवस्था करावी अशी मागणी पालिका प्रशासनाने पीएमपीएमएलकडे केली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.ज्या नागरिकांना खोकला, ताप अथवा तत्सम लक्षणे दिसतात असे नागरिक स्वत:हून अथवा डॉक्टरांनी सांगितल्यामुळे डॉ. नायडू रुग्णालयामध्ये नागरिक तपासणीकरिता येत आहेत. ज्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते अशा रुग्णांना घरीच विलगीकरण करुन ठेवण्यात येते. परंतू, ज्यांना डॉक्टरांच्या प्रत्यक्ष देखरेखीची आणि काही औषधोपचाराची आवश्यकता आहे अशा रुग्णांना नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येते.या रुग्णांचा चौदा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे नमुने पुन्हा वैद्यकीय तपासणीकरिता पाठविले जातात. हे नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडले जाते. परंतू, सध्या जमावबंदी असून सर्व प्रकारच्या वाहनांना आणि वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे. या रुग्णांना सोडल्यानंतर त्यांना घरी जाण्याकरिता पीएमपी बस उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रशासनाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे. त्यावर पीएमपी प्रशासन निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलHomeघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस