रुंदीकरणासाठी २५ कोटी निधीची मागणी
गराडे : कोंंढवा बुद्रुक ते बोपदेव घाट मार्गे सासवड आणि परिंचेला जाणारा रस्ता अरुंद आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २५ कोटी निधी द्यावा, अशी मागणी भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.
कोंढवा बुद्रुक-परिंचे या रस्त्याचा वापर फलटण, बारामतीला जाण्यासाठी नागरिक करीत असतात. हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीसाठी ताे अपुरा ठरत आहे. म्हणून आपण सीआरएफ फंडातून कोंढवा (खडी मशीन चौक) पर्यंत सुधारणा आणि रुंदीकरण भिवरी, हिवरे, सासवड, परिंचे, वीर ते खंडाळा एनएच-४ रोड केएम १/६०९ ते २९/०० एस एच -१३१ ता-हवेली जि-पुणे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोय होईल, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, यावेळी गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवीत रस्त्याच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
२६ गराडे
नितीन गडकरी यांना निवेदन देताना जालिंदर कामठे.