शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 2:55 PM

उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते

ठळक मुद्दे उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

पुणे: इंदापूरसाठीपाणी मिळणे गरजेचे आहे. उजनी धरणातूनपाणी उचलले तर ते शक्यही होईल. तसा निर्णय घेतला जाईल, तत्पुर्वी धरणातून पाणी उचलण्यासाठी म्हणून उपसासिंचन योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरीत पाटंबंधारे खात्याकडे द्यावेत,असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी पाटील विधानभवनात आले होते. विधानभवनाच्या आवारात त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून सकाळीच इंदापूर तालुक्यातील २७ गावांमधील नागरिक ठाण मांडून बसले होते. आमदार दत्ता भरणे, प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. प्रताप पाटील म्हणाले, इंदापूरमधील निरगुडे, अकोले, कळस अशी एकूण २७ गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत. प्यायलाही पाणी नाही. तरीही पाटंबंधारे खाते दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळेच असे आंदोलन करून लक्ष वेधण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. चंद्रकांत पाटील थेट बैठकीसाठी निघून गेल्यामुळे आंदोलक संतप्त झाले, मात्र आतून बैठकीनंतर चर्चा करण्यात येईल असा निरोप आल्यानंतर ते शांत झाले. प्रताप पाटील यांनी सांगितले की, पाटबंधारे खात्याचे अधिकारी त्यांच्या राजकीय दबाव असल्याची माहिती देतात. यापुर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडले की ते कॅनॉलद्वारे या परिसरात येत असे. त्यातून १४ तलाव भरले जात. त्यामुळे या २७ गावांची गरज भागत होती. आता कोणतीही पुर्वसुचना न देता किंवा पर्यायी व्यवस्था न करता थेट पाणी देणे बंद करण्यात आले. बैठकीमध्ये आत आमदार भरणे यांनी पाटील यांच्यापुढे हीच तक्रार केली. पाटील यांनी सर्व आंदोलकांना आत बोलावून त्यांची भेट घेतली व म्हणणे ऐकले. उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते. हे लक्षात घेऊन तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गावांनी पाटबंधारे खाते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवावेत, त्यांना त्वरीत मंजूरी देऊ. पाण्याशिवाय कोणतेही गाव राहू देणार नाही असे आश्वासन पाटील यांनी दिले. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी