पुणे : महापालिका हद्दीतील मोकाट आणि भटक्या वराहांच्या नियंत्रणासाठी फॉर्मर चॉईस या संस्थेला एक वराह (डुक्कर) पकडण्यासाठी १ हजार ४२५ रुपये दिले जाणार आहेत़ महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निवेदला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार भटके आणि मोकाट वराह पकडण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या वाहनांमार्फत कारवाई करण्यात येते. या कारवाईत पकडण्यात आलेल्या वराहांची अधिकृत कत्तलखान्यात विल्हेवाट लावण्यात येते. ३१ जुलै २०१८ ते मार्च २०२१ या कालावधीत ४० हजार ३८६ वराह पकडण्यात आली. लिलावापोटी महापालिकेला यातून सुमारे ६० लाख ७० हजार रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे़
------------
फुरसुंगीत टँकरद्वारे पाणीपुरवठा
कचरा डेपोमुळे पिण्याचे पाणी दूषित झालेल्या आणि महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या फुरसुंगी गावात आवश्यकतेनुसार, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ९९ लाख ८२ हजार रुपयांच्या निविदेलाही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़