वरवंड: ता-दौंड वरवंड येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा वरवंड येथील बाजार मैदानावर होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज दौंड तालुका यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आले.
वरवंड येथील मनोज जरांगे पाटील यांची सभा दौंड तालुक्यांमध्ये प्रथमच वरवंड येथे होत असल्याने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. या तिसऱ्या टप्प्यातील अदोलन सुरु करणार असून ही तिसऱ्या टप्प्यातील सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे गुरुवार दिनांक 16 रोजी होणार आहे. या सभेमध्ये मराठा आरक्षणाची भूमिका, सरकार ला दिलेला वेळ व यानंतर समाजाने कोणती भूमिका घेणार आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत यासभेसाठी मोठा समाज बांधव उपस्थित राहणार आहे. या येणाऱ्या समाज बांधवांचा वाहनांसाठी वरवंड मध्ये वाहन पार्किंग सोय करण्यात येणार आहे.
ही सोय पुढील प्रमाणे पुणे सोलापूर महामार्गा लगत सभा होणार असल्यामुळे वाहन स्थळ शिवानी शोरूम वरवंड, पेट्रोल पंप जवळ,श्री गोपीनाथ मंदिर वरवंड, श्री गोपीनाथ विद्यालय,श्री नागनाथ विद्यालय,कुमार वस्ती गृह, जिल्हा परिषद शाळा ,ए. सी.दिवेकर कॉलेज, नवीन विठ्ठल मंदिर, वाहन लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सभेसाठी 500 स्वयंसेवक काम करणार आहे. यासभेसाठी महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छता गृह, ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या सर्व मराठा समाजाला अल्पोहार वरवंड येथील मराठा समाज व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सकल दौंड तालुका मराठा यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.