धायरी : वडगाव बुद्रुकमध्ये गेल्या चार वर्षांत असंख्य लोकोपयोगी प्रकल्प सुरू केले असून ते पूर्णात्वास येण्यासाठी आवश्यक निधीची कमरता पडणार नाही. स्थानिक नगरसेवक हरिदास चरवड यांचा पाठपुरावा सुरू असल्याने त्यांच्या संकल्पनेतून ह्या भागात बरेच प्रकल्प साध्य होत असल्याचे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव बुद्रुक येथे व्यक्त केले.
आयुष्यमान भारत आरोग्य योजना कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक एसटी सवलत कार्डचे वितरणाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. नागरिकांना उपयुक्त असलेल्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास अशी शिबिरे अत्यंत उपयुक्त असल्याचे मत तापकीर यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, अनिल चरवड, कांतीराम वांजळे, आनद डफळ, कल्पेश ओसवाल, सुनील चरवड, सुनील कांबळे, गिरीश काशिद, आनंद भोईर, प्रवीण मोरे, चंद्रकांत पवळे, पै. अनंता बनकर, बाळासाहेब कंगले उपस्थित होते. अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : ज्येष्ठ नागरिकांस एसटीचे सवलत कार्ड देताना महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक हरिदास चरवड व इतर मान्यवर.