या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. टाकळकर, प्रबंधक कैलास पाचरणे, संपादक प्रा. दिलीप मुळूक उपस्थित होते. 'खेड तालुक्याचे पर्यटन' या संकल्पनेवर आधारित ज्ञानदीप वार्षिकांकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या अंकामुळे खेड तालुक्याचे भौगोलिक, धार्मिक पर्यटन वाढण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. या ज्ञानदीप प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी संस्था व महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या पुढील जडणघडणीत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
३१ राजगुरुनगर ज्ञानदीप
ज्ञानदीप अंकांचे प्रकाशन करताना दिलीप वळसे पाटील, ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील व इतर.