मंचर येथे माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी या स्मरणिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके आदी उपस्थित होते.
लोकनेते किसनराव बाणखेले स्मारक समितीच्या वतीने माजी खासदार बाणखेले यांच्या जीवनावर आधारित लोकनेता या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत बाणखेले यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शिवसेना नेते संजय राऊत,मंत्री बाळासाहेब पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच किरण राजगुरू, भाजपाचे किसान मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्ष संजय थोरात,लाला बँकेचे अध्यक्ष एन. एम. काळे, पांडुरंग पवार, नाथाभाऊ शेवाळे यांची भाषणे झाली. या वेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, मथुरानानी बाणखेले,रामदास बाणखेले, लाला बँकेचे उपाध्यक्ष नितीन लोणारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उपसरपंच युवराज बाणखेले,मंगेश बाणखेले,अवधूत शेटे, जे.के. थोरात, वसंतराव भालेराव, शरद निसाळ,अरुण लोंढे, दत्ता थोरात,माजी सरपंच अश्विनी शेटे,अशोक निघोट,राजू थोरात, प्रशांत गाडे,सचिन मोरडे, विकास शेटे,सागर बाणखेले आदींनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब बाणखेले यांनी केले. युवराज बाणखेले यांनी स्वागत तर निलेश पडवळ व पूजा थीगळे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना बाणखेले यांनी आभार मानले.
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या लोकनेता या स्मरणिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते झाले.