वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळा, वेदभवन वर्धापनदिननिमित्त आयोजित ऋग्वेद संहिता स्वाहाकाराची सांगता झाली. याप्रसंगी पुस्तकाचे प्रकाशन केले.
दत्तात्रय रामचंद्र केळकर यांच्या सहकाऱ्याने हे पुस्तक प्रकाशित केले. मकरंद बापट यांचा यावेळी सत्कार केला. हे पुस्तक सर्वसामान्य नागरिकांसाठी असून दैनंदिन जीवनात लागणारे सर्व विषय या पुस्तकात आहेत. सकाळी उठल्याबरोबर प्रात:स्मरण, स्नानविधी, तृचाकल्प, सूर्यनमस्कार, सार्थ देवपूजा यासह पंचसूक्त पवमान, ब्राह्मणस्पती सूक्त, मन्यसूक्त यासह ३१ विषय या पुस्तकात समाविष्ट आहेत.