शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

पीयूसीसाठी मोजले पावणेतीन कोटी, १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 5:19 AM

पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

पुणे : पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.शहरातील वाहनसंख्या ३६ लाख २७ हजार २८०वर पोहोचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे. वाहनसंख्येमुळे शहरातील वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचे प्रदूषण महामंडळाच्या पाहणीत दिसून आले आहे.गेल्या ८ वर्षांत ३४ हजार २३३ वाहनांची तपासणी आरटीओने केली. त्यात १३ हजार ४१७ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नव्हते. त्यातील १ हजार ८३२ वाहनचालकांवर २०११ ते जानेवारी २०१८ या कालावधीत खटले दाखल करण्यात आले. याच कालावधीत ८ हजार ७६८ वाहनचालकांकडून २ कोटी ७१ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या ८ वर्षांत २०१३-१४ या वर्षी सर्वांत कमी १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड जमा झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. आरटीओकडे वायुप्रदूषण मोजण्यासाठी ३ ते ४ यंत्रे आहेत. मात्र, त्यांची हाताळणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे समजते.गेल्या तीन वर्षांतील कारवाईचा तपशीलवर्ष तपासलेली पीयूसी नसलेली कोर्ट दंडात्मक एकूण दंडवाहने वाहने केस कारवाई (लाखांत)२०१५-१६ ६,६६२ १,८२७ ७२ १,१४२ ४०.७६२०१६-१७ ५,२१२ १,४४३ ७८ ९,९६ ४९.३७२०१७-जाने १८ ८,७६ ५,७२ ४२ ४,१० ३४.४४

टॅग्स :Puneपुणे