पुणे : महिलेने शरीरसुखासाठी नकार दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने महिलेला बंदुकीचा धाक दाखवला. तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत आनंद गाडे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात चिंचवड येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
ही घटना बाणेर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील अभिमानश्री हॉटेलजवळ घडला. अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी चंद्रकांत गाडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी या आरोपीकडे कामाला आहेत.
पीडित महिला २७ ऑक्टोबर रोजी अभिमानश्री हॉटेलजवळून जात असताना आरोपीने त्यांना गाडीत ओढून घेतले. महिलेला मिठी मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने अश्लील शिवागाळ केली. यानंतर त्याने त्याच्या गाडीत असलेली बंदूक काढून महिलेला आयुष्यातून उठवण्याची धमकी दिली. तसेच घरच्यांना संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.