पुणे : वेळ, काम आणि नियम तसेच कायद्यांवर बोट ठेवून चालणाऱ्या शिस्तप्रिय पुणेकरांनी गेल्या वर्षभरात हेल्मेटसाठी तब्बल साडेतीन कोटींचा दंड भरलेला आहे. ही दंडाच्या रकमेची सरासरी पाहता हेल्मेट वापरण्यास विरोध करणारे दुचाकीचालक दिवसाला सरासरी तब्बल १ लाख रुपयांचा दंड शासकीय तिजोरीत जमा करीत असल्याचे गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईवरून समोर येत आहे. विशेष म्हणजे सक्ती नसतानाही नियमित केलेल्या कारवाईत वसूल करण्यात आलेला हा दंड आहे. वाहतूक पोलिसांकडून शहरात दैनंदिन वाहतुकीचे नियोजन करताना नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यात हेल्मेटची कारवाईही केली जाते. मोटार वाहन कायदा १७७ नुसार हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. ते न घातल्यास संबंधित चालकांकडून १०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. पोलिसांकडून ही कारवाई केली जाते. शहर वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात म्हणजेच एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ अखेर हेल्मेट न घालणाऱ्या तब्बल ३ लाख ५० हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करीत सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत हेल्मेट कारवाईत वसूल करण्यात आलेला आजवरचा हा सर्वात मोठी दंडाची कारवाईची आहे. त्यामुळे पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या संख्येत भरमसाट वाढ होत चालली आहे. यासोबतच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. कागदपत्रांप्रमाणेच हेल्मेटही बंधनकारक हेल्मेट परिधान करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठीच्या अंमलबजावणीच्या सूचना आल्यानंतरच पोलिसांकडून ही कारवाई कडक स्वरूपात केली जाते. इतर वेळी वाहनचालकांची पोलिसांकडून तपासणी सुरू असताना, गाडीची कागदपत्रे, परवाना तपासताना नियमानुसार, ते हेल्मेट वापरतात का, याचीही तपासणी करतात. अशा वेळी गाडीची कागदपत्रे नसणे, परवाना नसणे यासाठी निमूटपणे दंड भरणारे वाहनचालक हेल्मेटबाबत दंड देण्यास मात्र तयार नसतात. प्रत्यक्षात हेल्मेटही कायद्याने बंधनकारक असल्याने गाडीची कागदपत्रे, तसेच वाहन चालविण्याच्या परवान्याप्रमाणेच ते जवळ बाळगणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर केलेली कारवाई वर्षकारवाई केलेले चालकवसूल केलेला दंड २०१३३९ हजार ६८९४१ लाख ६० हजार २०१४१ लाख ९६ हजार ८०२२ कोटी २ लाख १० हजार२०१५३ लाख ५० हजार३ कोटी ५० लाख
पुणेकर दिवसाला भरतात एक लाखाचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 4:36 AM