पांडुरंग मरगजे
धनकवडी : भारती विद्यापीठ शारीरिक शिक्षण महाविद्यालया ची माजी विद्यार्थिनी अन्विता सबनीस हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पानांमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. तिने २४ तासांत मोटरसायकलवरून जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विक्रम केला. २४ तासांमध्ये महिला रायडरने कव्हर केलेले कमाल अंतर. (Maximum Distance Covered by a Female Rider in 24 Hours.) या विक्रमा करिता, तिने होंडा सीबी आर ३००एफ या मोटारसायकलवरून १७४४ किलो मीटरचे अंतर कापले.
अन्विताने तिचा विक्रमी प्रवास कोल्हापुरातून सुरू केला आणि बंगलोर, हुबळी करत तमिळनाडूच्या सालेम पर्यंत जाऊन ती त्याच मार्गाने परतली आणि सातारा येथे प्रवास पूर्ण केला.
हा विक्रम करताना संपूर्ण राइड दरम्यान अन्विताने फ्युएलिंग ब्रेक्स सकट फक्त सात थांबे घेतले. या विक्रमी प्रवासात अनेक अनपेक्षित आव्हाने होती. बेंगळुरूजवळ, अन्विताला जवळपास तीन तास ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला ज्यामुळे रेकॉर्ड बनवण्याची शक्यता कमी झाली. हा अनुशेष भरून काढणे हे अन्वितासाठी मोठे काम होते. फ्युएलिंग ब्रेक्स व्यतिरिक्त, अन्विताने इतर सर्व थांबे कमी केले. अन्विता हिने तिच्या यशाकडे लक्ष केंद्रित केले आणि वचनबद्ध राहिली आणि येथेच तिने स्वतः सिद्ध करून २४ तासात १७४४ कि.मी. अंतर मोटरसायकल चालवून हा विक्रम पूर्ण केला. या विक्रमाबद्दल भारती विद्यापीठ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्निल विधाते तसेच प्राध्यापक डॉ.प्रदीप पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.
श्रीमती काश्मिरा मयांक शाह यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या स्वतः एक चित्रकार आणि न्यूट्रिशनीस्ट आहेत. त्यांनी अन्विताला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे एक मेडल आणि सर्टिफिकेट प्रदान केले. अक्षय देवलकर प्रमुख म्हणून उपस्थित होते. अन्विताने पुणे येथील भारती विद्यापीठातून शारीरिक शिक्षण या विषयात पदवी प्राप्त केली आहे.