शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पुणे : जिल्ह्यात रोज ११ अपघात; ४ मृत्यू, मागील वर्षभरात ४ हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:29 AM

मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून...

पुणे : जिल्ह्यात मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून त्यात १३९८ जणांचा बळी गेला आहे. २०१६ या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी मृतांचा आकडा किंचित घटल्याचे दिसते.प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मागील तीन वर्षांची अपघातांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून तीन वर्षांत अपघातांमध्ये सातत्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र, मृतांचा आकडा कमी झाल्याचे सकारात्मक चित्रही आहे. २०१५ मध्ये पुणे शहर व ग्रामीण भागात अनुक्रमे १४४३ आणि २६३५ असे एकूण ४०७८ एवढे अपघात झाले होते. त्यामध्ये १५४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. २०१६ मध्ये अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले. पण २०१७ मध्ये त्यातुलनेत वाढ झाली असून सुमारे चार हजार अपघात झाले आहेत. असे असले तरी मृतांचा आकडा घटल्याचे दिसते.पुणे शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मिळून सुमारे दीड हजार अपघात झाले. त्यात ३७३ जणांचा बळी गेला, तर ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार अपघातांत १ हजार २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मागील तीन वर्षांत एकूण ११ हजार ७९० अपघात झाले असून त्यात ४ हजार ४१२ जणांचा मृत्यू झाला, तर ९ हजार ५८२ लोक जखमी झाले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अपघातांची आकडेवारी मांडण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, अनिल वळीव, आनंद पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.कृती आराखडा : ट्रफिक पार्क उभारण्याची सूचनाशिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैठकीत प्रत्येक तालुक्यात ट्रॅफिक पार्क उभारण्याची सूचना केली. तसेच स्वतंत्र रस्ता सुरक्षा पथकाची निर्मिती, अपघात कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, महाविद्यालय व शाळास्तरावर रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांचे जाळे निर्माण करण्याबाबत त्यांना सूचना केल्या.द्रुतगती महामार्गावरून जाणाºया दुचाकी वाहनांवर कारवाई, तसेच मार्गाच्या जोन्ही बाजूने संरक्षक जाळी लावण्याची सूचना शिरोळे यांनी केली. तसेच त्यांनी खासदार निधीतून आरटीओ ५० लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणा खरेदी करण्यात येणार असून लहान परिवहन वाहनांचेयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे करण्यात येणार आहे. महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन तंत्राचा वापर करण्याबाबत साबळे यांनी सुचविले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे