लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दोन दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने पुणेकर ‘तापले’ आहेत. उन्हाचा तडाखा शुक्रवारी पुणेकरांनी अधिकच अनुभवला. शहरात यंदाच्या हंगामातील ४१.१ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. ढगाळ हवानामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या घामाच्या धारांचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. शुक्रवारी तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठून ४१.१ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली.
पुणे ४१़१ अंश; हंगामातील उच्चांकी तापमान
By admin | Published: May 06, 2017 2:43 AM