शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पुणे : अंगावरील तब्बल 53 तोळे सोने लुटले, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 6:54 AM

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना दोन व्यक्ती कात्रज बायपास चौकात थांबले आहेत व त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता कांबळे यांच्या पँटच्या खिशात एक प्लॅस्टिकची पिशवी आढळली. त्यामध्ये ५३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले. हे दोन आरोपी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले.

पुणे : मुलाच्या केस संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत, असे सांगून अंगावरील तब्बल ५३ तोळे सोने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ४ चेन, ३ ब्रेसलेट, २ अंगठ्या, विओ कंपनीचा मोबाईल असा १३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.या गुन्ह्यात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रणजित आनंदराव कांबळे (वय २५, रा. मु. पो भाळवणी, ता. पंढरपूर जि. सोलापूर) आणि सचिन हनुमंत कुरळे (रा. उघडेवाडी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.शेलार यांच्या फिर्यादीनुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का? यासह फरारी तपास चालू असल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर. मोहिते, कृष्णा निढाळकर, चंद्रकांत फडतरे, प्रणव संकपाळ, उज्ज्वल मोकाशी, अमोल पवार, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, महेश मंडलिक, कुंदन शिंदे, अभिजित रत्नपारखी यांनी ही कामगिरी केली.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना दोन व्यक्ती कात्रज बायपास चौकात थांबले आहेत व त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता कांबळे यांच्या पँटच्या खिशात एक प्लॅस्टिकची पिशवी आढळली. त्यामध्ये ५३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले. हे दोन आरोपी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले. फिर्यादी मुकेश शेलार यांची कर्वेनगर परिसरात ज्यूसची गाडी आहे, त्यांचा मुलगा एका खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. त्यामुळे मुलाच्या संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत, असे सांगून शेलार यांना बोलावून आरोपी व त्यांचे साथीदार तेजस जाधव, रामभाऊ डावरे व त्याचा मित्र यांनी मिळून त्याला गाडीत जबरदस्तीने पुणे-बंगलोर हायवेवर नेऊन चाकूचा धाक दाखवत, मुलाला ठार मारण्याची धमकी देत लुबाडले. त्यानंतर खेड शिवापूर येथे सोडून दिले.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस