शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Pune: लहान चिमुरडा बिबट्याला समजला कुत्रा अन् आई-वडील घाबरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 9:37 PM

Pune News: अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आज एका शेतमजूर दांपत्याला आली. दोन वर्षाच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रे समजून आई-वडिलांना भू भू (श्वान) आहे म्हणून दाखवले आणि आई-वडिलांचा बिबट्याला पाहून थरकाप  उडाला. 

प्रताप हिंगे, अवसरी - अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आज एका शेतमजूर दांपत्याला आली. दोन वर्षाच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रे समजून आई-वडिलांना भू भू (श्वान) आहे म्हणून दाखवले आणि आई-वडिलांचा बिबट्याला पाहून थरकाप  उडाला.  तात्काळ लहान मुलाला उचलून पळून बाजूला गेले आणि सुटकेचा विश्वास सोडला.

उन्हाळ्यामुळे सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सुरू आहे. आज दि. २८ (मंगळवार) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अवसरी खुर्द येथील कोसरपट्टी या परिसरात विकास टेमकर यांच्या शेतामध्ये दोन शेतमजूर (पती-पत्नी) बाजरीची तोडणी करत असताना त्यांच्याबरोबर त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगा देखील बरोबरच होता. बाजरी तोडणी करत असताना लहान मुलांनी वडिलांना सांगितले मागे भू-भू आहे.

वडिलांनी मागे वळून पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याचा बारीक बछडा व मादी होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पती-पत्नी आपल्या लहान मुलाला उचलून घेऊन लांब पळाले व विकास टेमकर यांना या घटनेची माहिती दिली व टेमकर यांनी वन विभागाला ही माहिती कळवली, तात्काळ वन विभागाचे वनरक्षक रईस मोमीन, वनरक्षक सी. एस. शिवचरण, बिबट रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर मिलिंद टेमकर घटनास्थळी येऊन पाहणी केली.

या घटनास्थळाच्या ठिकाणी चारही बाजूने उसाचे क्षेत्र व मधोमध बाजरीचे क्षेत्र आहे, वनरक्षक रईस मोमीन यांनी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावला आहे. रईस मोमीन, सी एस शिवचरण यांनी या परिसरातील नागरिकांना सजग राहण्याचे आव्हान केले, या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून एकटे फिरू नये व शेती कामे करताना शक्यतो लहान मुलांना घरीच ठेवावे, घरी ठेवणे शक्य नसेल तर आपल्या नजरेसमोरच शेती कामे करताना लहान मुलांना ठेवावी व त्यांना गडद रंगाचे कपडे घालू नये. असे आव्हान नागरिकांना यावेळेस मोमीन यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या