पुणे - मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची घडना पुण्यातील वाघोली, उबाळेनगर येथे घडली आहे. ही आग शुक्रवारी रात्री ११.४३ च्या सुमारास लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवल्याने ही आग बाजूच्या सिलेंडर असलेल्या गोडाऊनमध्ये पसरली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल राञी ११.४३ वाजता वाघोली, उबाळे नगर येथे "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. त्यात ४ सिलेंडर फुटले. दरम्यान, पुणे ५ व पीएमआरडीए ४ अशी एकुण ९ अग्निशमन वाहने व जवान यांनी आग नियंत्रणात आणली. तसेच दुर्देवाने या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह घटनास्थळी आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. ही आग लागली त्या गोडाऊनशेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊनकडे जवानांनी खबरदारी घेत आग पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे.
Pune: मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग, तीन कामगारांचा जळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 10:19 AM