पुणे (यवत) : लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे. जाण्यासाठी तयार (Ready To Go...) असे स्टेट्स त्यांनी टाकले आणि गेले ते कायमचेच !
एकाच वेळी गावातील नऊ युवक ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.यवत स्टेशन भागातील विशाल सुभाष यादव , निखिल चंद्रकांत वाबळे , अक्षय चंद्रकांत घिगे , दत्ता गणेश यादव , स्टेशन रोड परिसरातील सोनू उर्फ नूर महंमद दाया , परवेझ अशपाक आत्तार , महालक्ष्मी नगर मधील अक्षय भारत वाईकर , गावठाण मधील जुबेर अजित मुलानी व कासुर्डी येथील शुभम रामदास भिसे यांचा भीषण अपघात जागीच मृत्यू झाला.
काल सकाळी यवत गावातील नऊ युवक वर्षा विहार आणि फिरण्यासाठी रायगड व ताम्हणी घाटाकडे रवाना झाले. सध्याच्या काळात सोशल मिडियाच्या जमान्यानुसार कुठेही गेले तरी सेल्फी काढून व्हाट्स अपला स्टेटस ठेवले जातात .काल यवत मधून फिरण्यासाठी गेलेले युवकही यासाठी अपवाद नव्हते.यवत मधून निघाल्यानंतर सर्व जण लोणी काळभोर येथे योग हॉस्पिटलसमोर थांबले होते. त्यावेळी महामार्गालगत उभे राहून सर्वांनी एकत्रित सेल्फी फोटो घेतला होता.त्यांनी घेतलेल्या फोटो मध्ये नऊ पैकी आठ जण होते. मयतांपैकी परवेझ आत्तार याने त्याच्या व्हाट्स अपवर आठ जणांचा एकत्रित घेतलेला सेल्फी स्टेटस वरून सर्वांबरोबर शेअर केला होता. व्हाट्स अप वरून ठेवलेल्या स्टेटस खाली परवेझ याने "रेडी टू गो" (Ready To Go) असा संदेश लिहिला होता.संदेश लिहिला. मात्र दुर्दैवाने तोच फोटो त्या मित्रांचा एकत्रित अखेरच्या फोटोंपैकी एक ठरला. तर परवेझ याने लिहिलेला संदेश "Ready To Go" सर्वांच्याच मनाला चटका लावणारा ठरला.
जाताना सेल्फी काढला तेथून काहीच अंतरावर घडला अपघात :या युवकांनी महामार्गालगत उभे राहत सेल्फी काढला होता.फिरून येत असताना मात्र जेथे सेल्फी काढला त्या ठिकाणापासून काही अंतरावरच काळाने त्यांच्यावर घाला घातला.