पुणेः दहा दिवस कडक लॅाकडाउन करावा, अशी थेट भूमिका प्रशासनाने घेतली आहे. लोकप्रतिनिधींचा विरोध असला तरी लॅाकडाउन आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान ६ ते ६ बाहेर पडण्यास निर्बंध ,तसेच बसेस बंद, मॉल हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवायला खासदार बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात आढावा बैठक सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. यामध्ये प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.
बैठकी दरम्यान विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले “ लाॅकडाऊन नको या भावना ठिक आहे.पण संख्या लक्षात घेता.बेड उपलब्ध करुन देणे भविष्यात कठीण होईल.संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही तरी कडक निर्बंध घालावेच लागेल.गेल्या एक महिन्यांपासून निर्बंध हळूहळू वाढवलेपण फरक नाही पडला.. आता कडक निर्णय घ्यावा लागेल.सिनेमागृह पूर्ण पणे बंद ठेवा.अत्यावश्यक दुकाने सोडून.. अन्य सर्व दुकाने बंद करावेच लागेल.सामाजिक भावनाचा आम्हाला कदर..दहा दिवस तरी बंद करा”
महापालिका आयुक्त विक्रमकुमार म्हणाले “ पुढील आठवड्यात दोन-तीन दिवस सरकारी सुट्टी आहे. चार दिवस अस्थापना सुरू आहे.त्यामुळे किमान सात दिवस सर्व बंद ठेवले तर लोकांना फार त्रास होणार नाही व किमान काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी होईल.
पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले “ गेल्या एक महिन्यांपासून निर्बंध हळूहळू कडक करत गेलो, पण त्याचा तसा फारसा उपयोग होत नाही असे दिसते... त्यामुळे 14 दिवस तरी कडक लाॅकडाऊन करा”