पुणे: - कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे संरचना बदलून नवीन बाजार समिती अस्तित्वात आल्याने सुरू असलेली निवडणुक प्रक्रिया थांबवावी किंवा कसे याबद्दल स्पष्ट आदेश करावे, असे लेखी पत्र बाजार समितीच्या वतीने सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले होते. या पत्रावर प्राधिकरणाच्या वतीने निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यास स्पष्ट नकार दिला असून, मतदार यादीचा कार्यक्रम सुरुच ठेवण्यास सांगितले आहे. बाजार समितीची संरचना बदलताना जिल्हा सहकार उपनिबंधक यांनी पणन अधिनियम कलम १३ (ए) नुसार समितीचे कार्यक्षेत्र पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि हवेली तालुका हे निश्चित करून तेथील प्रशासक मंडळ संपुष्टात आणून प्रशासक म्हणून बी.जे.देशमुख यांची नियुक्ती केली. नवीन बाजार समितीचे गठण झाल्याने समितीच्या संचालक मंडळाची सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया तशीच पुढे चालू ठेवावी अथवा थांबवावी याबद्दलची धारणा पक्की करण्यासंदर्भात प्रशासकांनी प्राधिकरणाला पत्र दिले होते. तसेच जिल्हा सहकार उपनिबंधकांनी प्रशासकाची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असल्याचे सांगत निवडणुक प्रक्रिया थांबविण्या विषयीचा अभिप्राय प्राधिकरणाला दिला होता. राज्य सहकार निवडणुक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी यासंदर्भात प्राधिकरणाच्या विधी सल्लागाराकडून अभिप्राय घेतला. तसेच प्राधिकरणाचे मत व्यक्त करून बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया थांबविता येणार नाही. अथवा सक्षम प्राधिकारी नाही म्हणून निवडणुक घेऊ नये अशी आपली धारणा पक्की करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी निवडणुक उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा सहकार उपनिबंधक यांनाही कळविले आहे.
पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 9:06 PM
जिल्हा सहकार उपनिबंधकांनी प्रशासकाची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असल्याचे सांगत निवडणुक प्रक्रिया थांबविण्या विषयीचा अभिप्राय प्राधिकरणाला दिला होता.
ठळक मुद्देप्रक्रिया सुरु ठेवा :सहकार प्राधिकरणाचे आदेशप्राधिकरणाच्या वतीने निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यास स्पष्ट नकार