पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या आवारात मागणीच्या तुलनेत भेंडी, वांगी, गवार या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे या भाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर कोथंबिरीला मागणी असल्यामुळे शेकडा गड्डीमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात भेंडीचे क्विंटलचे दर १००० ते ३००० हजार होते.तर मंगळवारी भेंडीला १५०० ते ४००० हजार भाव मिळाला. पुणे मार्केटमध्ये कोथंबिरीची ७४ हजार २३४ जुडी एवढी आवक झाली.कोथंबिरीला शेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाला. तर मेथीला ७०० ते ९०० रुपये दर मिळाला.कांद्याला क्विंटला ७०० ते १६०० एवढा दर मिळाला. तसेच बटाटा १३०० ते २३००, आले ३००० ते ६५००, गवार २५०० ते ५०००,मटार ६००० ते ८०००, वांगी १००० ते ३५०० तर हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० दर मिळाला.