शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

करपा, तांबेरा आणि खोडकिडा रोगांमुळे भातपिकावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:43 AM

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.

तळेघर - आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व परिसर भातशेतीचे आगर समजले जाते. पुणे जिल्ह्यातील एकूण ६३,८०० हेक्टर भात क्षेत्रापैकी ५,१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी हा रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेवर पेरण्या करतो. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवानी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये काही ठिकाणी धूळवाफेवर, तर काही ठिकाणी चिडवाफेवर पेरण्या उरकून घेतल्या.गत वर्षीपेक्षा चालू वर्षी रोहिणी व मृग या नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भातपेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड झालेला दाणा उगवून येऊन भातरोपे चांगल्या प्रकारे तरारल्याने आदिवासी शेतकºयांनी लागवडी उरकून घेतल्या. यानंतर या भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भातरोपे सडून गेली, तर काही ठिकाणी बांध फुटून भातखाचरे गाडली गेली.तिन्ही खोºयांमध्ये भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने या रोगांनी ग्रासल्याने पिक पिवळे व तांबडे पडून जळून गेले आहे.गेल्या २० ते २५ दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातपिके जळू लागली आहेत. हे रोग पडल्यानंतर पुढील लक्षणे जाणवत आहेत.या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा १२ महिन्यांतून भात हे एकमेव पीक घेतो.भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. कित्येक वर्षांपासून निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बारा महिने मोठ्या आशेने काबाडकष्ट करून ऐन वेळी होणाºया निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने ग्रासल्याने सगळीकडे भातरोपे तांबडी-पिवळी पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरापासून पावसाने या भागातून काढता पाय घेतला आहे. सद्य:स्थितीमध्ये या भागात भातपिकासाठी दोन ते तीन वेळा पावसाची आवश्यकता आहे. या एक ते दोन दिवसांमध्ये जर वेळेत पाऊस झाला नाही, तर एकीकडे रोगांनी ग्रासलेले आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या